Alumni


The Alumni Association was formed since the inception of the college and it has been playing an important role in the welfare for the Alumni of our college. The Alumni Association was legally registered in the year 2020 and since then it has been working very actively at the college level. Today, many alumni of this college are working in different positions in different fields. To date, the college has produced many social activists, political leaders, businessmen, professional, Teachers etc.

As per the tradition of the college, many alumni are at the pinnacle of worldly attachment. These successful alumni of the college level decided to contribute their time, money, labour etc. for the welfare of these students to fulfill their duty of social responsibility through the Alumni Association.

Aware of this social responsibility, most of the Alumni have a registered their active participation in the Alumni Meet organized by the Alumni Association on 29 th August 2021 by raising Rs. 50,000/- in the student welfare fund. Alumni, who wish to contribute to the student welfare in the three forms of time, money, labour etc. such alumni can contact to the Principal of the college, Prof. Capt. V. L. Khalatkar or Coordinator of the Alumni Association Prof. S. P. Badwaik.

Financial Contributions will be accepted in cash/Cheque/online format.

Thank you to everyone for fulfilling their social responsibilities for the welfare and development of the students/alumni.

महाविद्यालयाच्या स्थापनेपासूनच निर्माण करण्यात आलेली ‘माजी विद्यार्थी संघटना’ ही आमच्या महाविद्यालयातील आजी माजी विद्यार्थ्यांच्या कल्याणामध्ये महत्वाची भूमिका निभावित आहे. सन २०२० मध्ये माजी विद्यार्थी संघटनेची कायदेशीर नोंदणी करण्यात आलेली असून तेव्हापासून ते आजपर्यंत महाविद्यालयीन स्तरावर ही संघटना अतिशय सक्रिय पद्धतीने कार्यरत आहे.

आज रोजी या महाविद्यालयातील अनेक माजी विधार्थी विविध क्षेत्रामध्ये विविध पदावर नोकरी करीत आहेत. या महाविद्यालयाने आजपर्यंत अनेक सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते, उद्योगपती, व्यावसायिक, शिक्षक घडविलेले आहेत. महाविद्यालयाच्या परंपरेप्रमाणे अनेक माजी विद्यार्थी लौकीक प्राप्तीच्या उच्च शिखरावर विराजमान झालेले आहेत. महाविद्यालयातील याच यशस्वी विद्यार्थ्यांनी ‘माजी विद्यार्थी संघटनेच्या’ माध्यमातून आपले सामाजिक उत्तरदायित्वाचे कर्तव्य पार पाडण्याकरीता आजी माजी विद्यार्थ्यांच्या कल्याणाकरीता आपल्या क्षमतेनुसार वेळ-पैसा-श्रम इत्यादींचे योगदान देण्याचा संकल्प केला आहे. याच सामाजिक उत्तरदायित्वाच्या जाणीवेतून माजी विद्यार्थी संघटनेने दिनांक 29 ऑगस्ट 2021 रोजी आयोजित करण्यात आलेल्या माजी विद्यार्थी मेळाव्यामध्ये जवळपास (50,000 रुपये पेक्षा जास्त) पन्नास हजार रुपयापेक्षाही अधिक रक्कम “विद्यार्थी कल्याण निधी” मध्ये उभारून सर्व माजी विद्यार्थ्यांनी आपला सक्रीय सहभाग नोंदविलेला आहे.

ज्या सक्षम माजी विद्यार्थ्यांना विद्यार्थी कल्याणामध्ये वेळ-पैसा-श्रम या तीनही स्वरूपात अंशदान देण्याची इच्छा आहे, अशा विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. कॅप्टन व्ही. एल. खळतकर सर किंवा ‘माजी विद्यार्थी संघटनेचे’ समन्वयक प्रा. एस. पी. बडवाईक सर यांचेशी संपर्क साधावा.

आर्थिक योगदान हे रोख/चेक/online स्वरूपात स्विकारण्यात येईल. प्रत्येकाने आजी माजी विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी व विकासासाठी आपले सामाजिक उत्तरदायित्वाचे कर्तव्य पार पाडावे या अपेक्षेसह साभार धन्यवाद .............
Copyright ©2021 Bapuraoji Butle Arts, Narayanrao Bhat Commerce and Bapusaheb Patil Science College, Digras. All rights reserved. | Design by